+91 9881434473

चांगुलपणाची चळवळ

सर्जनशील, सकारात्मक, समावेशक प्रवास

परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेली आहे चांगुलपणाची चळवळ. सर्जनशीलता, सकारात्मकता, सर्वसमावेशकता या तीन तत्वांवर ही चांगुलपणाची चळवळ आधारित आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता या संविधानातील तीन महत्त्वाच्या मूल्यांना पायाभूत मानून ही चांगुलपणाची चळवळ सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. ‘सर्वजन सुखाय सर्वजन हितायहे चांगुलपणाच्या चळवळीचं ब्रीदवाक्य आहे. सर्व समावेशक हे या चळवळीचं वेगळेपण आहे.  प्रत्येक व्यक्ती मधला चांगुलपणा समाजापर्यंत पोहोचवणं, सर्वसाधारण माणसातल्या चांगुलपणाला वाव मिळणं, आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेला चांगुलपणा वृद्धिंगत होण्यासाठी ही चांगुलपणाची चळवळ सुरू झालेली आहे.

 ।।सर्वजन सुखाय सर्वजन हिताय।।

डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन प्रकाशित 

चांगुलपणाच्या चळवळीचा दिवाळी अंक

विषय:- सर्जनशील, सकारात्मक, समवेशक प्रवास 

संकल्पक :- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

संपादक    :- सौ. शुभांगी नितीन मुळे