वाचन संस्कृती आपण सर्वजण जपतो आहोत
अनेक वर्षांपासून आपण दिवाळी अंक वाचत आलो आहोत आणि अनेक वर्षांपासूनचे अंक आपण जपून देखील ठेवले असतील. त्याचप्रमाणे आम्ही देखील चांगुलपणाच्या चळवळीचे मागील तीन वर्षांचे दिवाळी अंक जपून ठेवले आहेत खास आपल्या सर्वांकरता ! आणि म्हणूनच या तिन्ही वर्षांच्या म्हणजे २०२०,२०२१, २०२२ च्या दिवाळी अंक आपण डाऊनलोड करू शकता.
पुरस्कार
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार सोहळा तसेच जीवनगौरव पुरस्कार सोहळा व साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार सोहळा नुकताच 28 एप्रिल रोजी पुण्यात अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
आनंदाची गोष्ट म्हणजे चांगुलपणाच्या चळवळीच्या दिवाळी अंकाला विशिष्ट विषय या विभागात प्रथम पुरस्कार मिळाला.
त्याचप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. चित्रकार श्री अन्वर हुसेन ह्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन!
या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉ. गो.बं देगलूरकर (मूर्ती शास्त्राचे अभ्यासक), प्रमुख अतिथी होत्या डॉ. उमा कुलकर्णी (ज्येष्ठ लेखिका, अनुवादक).
या कार्यक्रमात श्री दादासाहेब उर्फ शिरीष घाटपांडे ( संचालक, उज्वल ग्रंथ भांडार ) यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. तारा भवाळकर ( ज्येष्ठ समीक्षक,संशोधक) यांना साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष श्री. राजीव बर्वे व इतर सर्व मान्यवरांचे प्रेरणादायी विचार यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.
पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशनच्या तर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘चांगुलपणाच्या चळवळीच्या‘ दिवाळी अंकाला पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार प्राप्त झाला. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड पुणे येथे हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. अतिशय छान पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा साजरा झाला.
सर्व मान्यवरांचे प्रेरणादायी विचार ऐकून एक नवी स्फूर्ती मिळाली.
वाचन संस्कृती जोपासणे, दिवाळी अंकाची परंपरा, येणारी आव्हाने अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने चांगुलपणाच्या चळवळीचा दिवाळी अंक सन्मानित झाला ही खरोखरी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेतून अधिक उत्तमोत्तम साहित्यनिर्मितीचा प्रयत्न चांगुलपणाची चळवळ नक्कीच करेल.