+91 9881434473

अनुक्रमणिका

चांगुलपणाच्या चळवळीच्या संगीतविषयकहे तो सुरांचे देणेया दिवाळी अंकाचा दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सेवा भवन, एरंडवणे पुणे येथे डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन व्ही फाउंडेशनच्या वतीने लोकार्पण सोहळा अतिशय दिमागात संपन्न झाला. ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक संगीताचार्य डॉ. विकास कशाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य चांगुलपणाच्या चळवळीचे मार्गदर्शक  डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांची सन्माननीय उपस्थिती होती. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते माजी सैन्य अधिकारी मा.अलीभाई देखाणी यांची विशेष उपस्थिती होती. चांगुलपणाच्या चळवळीच्या दिवाळी अंकाच्या संपादिका शुभांगी मुळे चांगुलपणाच्या चळवळीचे कार्यकारी अध्यक्ष राज देशमुख हे देखील उपस्थित होते.

पुण्यात सर्व मुख्य स्टॉल्स वर चांगुलपणाच्या चळवळीच्या दिवाळी अंकहे तो सुरांचे देणे  उपलब्ध.

त्याचप्रमाणे मुंबईत देखील अनेक स्टॉल्सवर ग्रंथालयांमध्ये उपलब्ध.

तसेच कोल्हापूर, नाशिक, सोलापूर अशा अनेक ठिकाणी स्टॉल्सवर उपलब्ध.

सुरुवातीला दीप प्रज्वलन, गुरुचं गणेशाचं स्तवन याने अतिशय पवित्र वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनेक गायक, वादक, संगीतकार, संगीतज्ञ, चांगुलपणाच्या चळवळीचे सर्व ठिकाणाहून आलेले सदस्य, रसिक श्रोते अशा दिगजांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात दिवाळी अंकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

नीना भेडसगावकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

मान्यवरांचे संगीत विषयक विचार, लेखकांची मनोगते आणि रसिक श्रोत्यांचा उत्साह ह्यामुळे  हा लोकार्पण सोहळा अविस्मरणीय ठरला.